Sunday, July 26, 2015

सकळ देवांचा नियंता |
माझी विठठल मातापिता ||
तो हा उभा विटेवरी |
कट धरुनिया करी ||
मिरवे वैजयंती माळा |
केशर कस्तुरीचा टिळा ||
मकराकार कुंडले |
करी शंखचक्र शोभले ||
एका शरण जनार्दनी |
विठठल पाहे ध्यानी मनी ||

No comments: